अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर आज हातोडा पडणार; किरीट सोमय्याही दापोलीत दाखल!

गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या विरुद्ध अनिल परब या वादाच्या केंद्रस्थानी राहिलेलं दापोलीतलं साई रिसॉर्ट आज पाडलं जाणार आहे. अनिल परब यांच्या मालकीचं हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी सर्वात आधी केला होता. पर्यावरण विभागानं आखून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून समुद्रकिनारी हे रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. यावर न्यायालयात रीतसर सुनावणी झाल्यानंतर अखेर आज दापोलीतील साई रिसॉर्टवर हातोडा पडणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply