अनिल देशमुख ऑर्थर रोड तुरुंगातून जसलोक रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपचारासाठी मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल झाले आहेत. मागील काही दिवसांपासून अनिल देशमुख यांच्याकडून प्रकृतीबाबत तक्रारी येत होत्या. त्याबाबत त्यांनी विशेष सीबीआय न्यायालयाकडे अर्ज करत खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मागितली होती. न्यायालयाने अनिल देशमुख यांची ही मागणी मान्य करत त्यांना खासगी रुग्णालयात उपचाराची मुभा दिली. त्यानंतर आता देशमुख जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.

अनिल देशमुख यांची सध्या कथित १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात कोठडीत असतानाच त्यांनी तब्येतीबाबत काही तक्रारी केल्या. त्यामुळे आता त्यांनी एन्जिओग्राफी करण्यासाठी आर्थर रोड तुरुंगातून जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तपासणीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने देशमुख यांच्यावर कोणता उपचार करायचा हे ठरणार आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या जामिनाला सीबीआयने विरोध केला आहे. या जामीन अर्जावर १८ ऑक्टोबरपासून सुनावणी होणार आहे. १०० कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी ईडीसह सीबीआयकडूनही अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे.

ईडी प्रकरणात देशमुखांचा जामीन अर्ज मंजूर झाला आहे. मात्र, या प्रकरणात सीबीआयचीही कोठडी असल्याने आता सीबीआय प्रकरणात न्यायालय काय निर्णय देतं यावरच अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार की नाही हे ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply