अनलॉकनंतर महाविद्यालयात कार्यक्रमांना परवानगी

पुणे - तब्बल दोन वर्षांनंतर महाविद्यालयांतील सभागृहे, मैदाने आणि रंगमंच पुन्हा एकदा बहरत आहेत. व्यक्तिमत्त्व विकासापासून ते उद्योजकतेपर्यंत विविध ४३० हून अधिक कार्यक्रम, प्रशिक्षण आणि शिबिरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी  संलग्न महाविद्यालयांत पार पडणार आहेत. विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने मे महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. विद्यापीठाशीसंलग्न नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील ५०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक, सामाजिक, उद्योग आणि सुरक्षा आदी क्षेत्रांशी निगडित प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे म्हणाले,‘‘विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सामाजिक आणि कौशल्य विकासाच्या कार्यक्रमांचे आयोजन मंडळामार्फत करण्यात येते. लॉकडाउनमध्येच महाविद्यालयस्तरावर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रस्तावही महाविद्यालयांकडून मागविण्यात आले. आतापर्यंत आलेल्या सर्वच प्रस्तावांचे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मूल्यांकन करत परवानगी देण्यात आली आहे.’’ ऑनलाइन, ऑफलाइन व्याख्यानांपासून विविध प्रशिक्षण शिबिरांचाही यात समावेश आहे. मे अखेर पर्यंत गट क प्रकारातील ३१० तर गट ब प्रकारातील १२० उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करत हे उपक्रम पार पडतील कला, संस्कृती व साहित्य विषयक प्रायोगिक कार्यक्रम, शिबिरे, चर्चासत्रे, कार्यशाळा आदींचे आयोजन. तसेच नवउद्योजक, दिव्यांग व्यक्ती, कौशल्य विकास शिबिरे. स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन, संसद, न्यायालय आदींचे अभिरूप कार्यक्रमही यात समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे कोविड काळाचा समाजावर झालेला परिणाम लक्षात घेऊन, आर्थिक, सामाजिक स्वास्थ्यासाठीही विविध कार्यक्रम महाविद्यालयस्तरावर होणार आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply