अथणी येथील शासकीय रुग्णालयावर छापा

अथणी - येथील शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया व गर्भाशय काढण्यासाठी अधिकारी पैसे उकळत असल्याच्या तक्रारी  लोकायुक्त खात्याकडे गेल्या. त्याची दखल घेऊन लोकायुक्त एसपी यशोदा वंटगुडे व डीवायएसपी जी. रघु यांच्या पथकाने अथणी शासकीय रुग्णालयावर बुधवारी (ता. २३) सकाळी ११ च्या सुमारास छापा टाकला. याबाबत अधिक माहिती अशी, अथणी शासकीय रुग्णालयात २०१९-२०२० कालावधीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रियेसाठी रक्कम उकळल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळेच लोकायुक्त एसपी यशोदा वंटगुडे व डीवायएसपी जी. रघु यांच्यासह पथकाकडून बुधवारी चार तास कारभाराची चौकशी व कागदपत्रांची तपासणी केली. पुढील तपासासाठी तेलसंग, ऐगळीला पथक रवाना झाले. अथणी शासकीय रुग्णालयात अधिकारी रुग्णांची दखल घेत नाहीत. रुग्णांकडून शस्त्रक्रियांसाठी हजारापासून पाच हजारांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी गेल्याने कारवाई झाली. या वेळी तालुका आरोग्याधिकारी डाॅ. बसगोंडा कागे, स्थानिक पोलिस कर्मचारी उपस्थित होते. एसपी यशोदा वंटगुडे व डीवायएसपी जी. रघू यांनी शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांक़डून माहिती घेतली. त्यांच्याकडून पुढील तपास होणार आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply