अणुकरार होणार पण…इराणची अमेरिकेला सर्वात मोठी ऑफर, ट्रम्प यांच्या निर्णयाकडे जगाचं लक्ष!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढलेला आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाला अमेरिकेचा विरोध आहे. त्यामुळे अमेरिकेने अनेकदा इराणवर हल्ला करण्याचा इशारा दिलेला आहे. तसेच ट्रम्प यांनी इराणवर अमेरिकेसोबत अणुकरार करण्यासाठी वारंवार दबाव टाकलेला आहे. अशातच आता मोठी अपडेट समोर आली आहे. इराणने अमेरिकेसोबत अणुकरार करण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र यासाठी इराणने अनेक अटी अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत. या अटी आता अमेरिका मान्य करणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराण करार करण्यासाठी तयार, पण…

इराणने अमेरिकेसोबत अणुकरार करण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र इराणने काही अटी अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत. जर अमेरिका आमच्यावरील निर्बंध उठवण्यास तयार असेल तरच करार होईल असे इराणने म्हटले आहे. बीबीसीशी बोलताना, इराणचे उपपरराष्ट्रमंत्री माजिद तख्त-रावांची म्हणाले की, तडजोड करण्याची तयारी दाखविण्याची जबाबदारी अमेरिकेची आहे. जर त्यांनी तयारी दर्शवली तर आम्ही कराराकडे वाटचाल करू. त्यांनी पुढे सांगितले की, जर निर्बंधांमध्ये सवलत दिली गेली, तर आम्ही अणुकराराबाबत चर्चा करण्यास तयार आहे.

चर्चा पुन्हा सुरू होणार

काही दिवसांपूर्वी इराण आणि अमेरिका या देशांमध्ये ओमानमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र यातून ठोस असा निष्कर्ष समोर आलेले नाही. आता तख्त-रावांची यांनी सांगितले की, मंगळवारी जिनेव्हा येथे चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, सुरुवातीच्या चर्चा सामान्यतः सकारात्मक होत्या, परंतु अद्याप काहीही सांगणे योग्य ठरणार नाही.

तर दुसरीकडे ट्रम्प यांनी ओमानमध्ये झालेली चर्चा ही सकरारात्मक होती असं विधान केला आहे. इराणने त्यांचा 60 टक्के समृद्ध युरेनियम साठा कमी करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. इराण अण्वस्त्रे विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे अशी संपूर्ण जगात चर्चा सरू आहे, त्यामुळेच अमेरिकेसह जगभरातील अनेक लोक इराणवर नाराज आहेत. मात्र ही बाब इराणने सातत्याने नाकारली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *