अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती चरणी ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अक्षय्य तृतीय सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही हा आंब्याचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे.

ही आंब्याची आरास पाहण्यास भाविकांनी एकच गर्दी केली आहे. तसेच हे आंबे उद्या ससूनमधील रुग्ण,अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *