साताऱ्यानंतर कोल्हापुरात गुणरत्न सदावर्तेवर गुन्हा दाखल

कोल्हापूर: गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाकडून आज चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या सुनावणी दरम्यान, सरकारी वकीलांकडून सदावर्ते यांना पोलिस कोठडी द्यावी अशी मागणीही करण्यात आली होती. दरम्यान साताऱ्यानंतर कोल्हापूर  शाहूपुरी पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.

मराठा आणि मागासवर्गीय समाजामध्ये वाद होऊन दंगे घडावेत अशी चिथावणी एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दिल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याबाबतची फिर्याद मराठा मोर्चाचे राज्य समन्वयक आणि याचिकाकर्ता दिलीप पाटील यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर ॲड. सदावर्तेंना अटक करण्यात आली. तेथील न्यायालयीन कामकाज सुरू असताना त्यांच्यावर सातारा पोलिसात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात नुकतीच त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसापूर्वीच मराठा आरक्षणा संदर्भातील एक तक्रार येथील दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र पाटील यांनी आज जातीय तेढ निर्माण होईल अशी चिथावणी दिल्याबद्दलची नवीन फिर्याद आज पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की दिलीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार ॲड. सदावर्ते (रा. मुंबई) यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या जातील हे माहित असताना सुद्धा जाणीवपूर्वक ५ मे २०२१ ला माननीय सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षणा संदर्भात दिलेल्या निर्णयानंतर ॲड. सदावर्ते यांनी एका मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी बोलताना, मागासवर्गीयांबद्दल काही अपशब्द वापरले. यातून मराठा समाजामध्ये आणि मागासवर्गीय समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून समाजाच्या जातीय भावना दुखावलेल्या आहेत. तसेच ॲड. सदावर्ते यांनी मराठा समाज आणि मागासवर्गीय समाजामध्ये वाद होऊन दंगे घडावेत अशी चिथावणी देणारी भडकावू वक्तव्य केले आहे. त्याबाबतची व्हिडीओ क्लिप, पेनड्राईव्ह द्वारे आज तपास कामात सादर करण्यात आली असल्याचे फिर्यादेत म्हटले आहे. याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply