साताऱ्यात शाळकरी मुलांच्या बसला भीषण आग; बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

साताऱ्यातील वाठार कॉलनी ( ता खंडाळा) येथे शाळेतल्या मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला आहे. बस शालेय मुलांना घेऊन जात असतानाच ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बस पूर्ण जळून खाक झाले

खंडाळा तालुक्यातील शेडगेवाडी येथून वाठार कॉलनी येथे शाळेतील मुलांना ही बस घेऊन जात असताना ही घटना घडली. गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात येतात चालकाने समय सूचकता दाखवत गाडी थांबवून सर्व मुलांना गाडीपासून लांब नेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *