सांगली : दुर्देवी घटना! व्हिडिओ शुट करताना अचानक लाट आली, अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं!

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तिघेजण ओमान देशात समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याची दुर्देवी घटना रविवारी १२ जुलै रोजी घडली आहे. या घटनेत जत येथील शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षाची मुलगी श्रुती व सहा वर्षाचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले आहेत. अद्याप समुद्रात त्यांचा शोध लागलेला नाही. या घटनेला शशिकांत म्हमाणे यांचे बंधू अॅड.राजकुमार म्हमाणे यांनी दुजोरा दिला आहे. 

मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती व अन्य एक मुलगी (नाव समजू शकले नाही ) यांच्यासह दुबई येथे राहण्यास होते.

बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने मयत शशिकांत, पत्नी, मुले व मित्रांसह दुबई जवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते. यावेळी शशिकांत यांनी त्याबाबतचा व्हिडिओ देखील त्यांनी बनवून,आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला होता. त्यानंतर ते ओमान येथील समुद्र किनाऱ्यावर गेले असता, त्या ठिकाणी प्रचंड अशा लाटा उसळत होत्या. 

दरम्यान, त्याचा लाईव्ह व्हिडिओ सुरू असताना एक प्रचंड मोठी लाट आली. या लाटेत काहीजण समुद्रात ओढले गेले. या दुर्घटनेत शशिकांत म्हमाणे, त्यांचा मुलगा श्रेयस आणि श्रुती हे तिघेजण यामध्ये वाहून गेले आहेत. तर पत्नी सारिका व एक मुलगी बचावल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे जतमध्ये शोककळा पसरली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply