संजय राऊत निर्दोष सुटतील का? छगन भुजबळ म्हणाले, “ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि…”

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत न्यायालयाने आणखी वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांना आता ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत राहावं लागणार आहे. ईडीने राऊतांवर गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी कारवाई केलीय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नसल्याचं म्हणत सूचक इशारा दिला आहे. ते गुरुवारी (४ ऑगस्ट) नाशिकमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “संजय राऊतांना मिळालेली ईडीची कोठडी हा न्यायालयीन कामकाजाचा भाग आहे. ईडीने न्यायालयात काही गोष्टी मांडल्या असतील. नेमक्या काय गोष्टी न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या याबाबत मी ऐकलेलं नाही. मात्र, अधिक तपासासाठी न्यायालयाने संजय राऊतांना ईडी कोठडी सुनावली असावी.”

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply