संगमनेर/ अहमदनगर : मुळा नदीला पुर; शेकडो शाळकरी मुलांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

संगमनेर/ अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील मुळा नदीला पुर आला असून शेकडो शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. संगमनेरच्या कोठे ब्रुद्रुक येथे मुलांना जीवघेना प्रवास करावा लागतो आहे. यामुळे आता मुलांच्या शैक्षनीक नुकसानी बरोबर पालकांना मुलांच्या जीवाची काळजी लागलेली आहे. सर्व पालक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन यांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे.

संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथील शाळेमध्ये कोठे खुर्दे येथी लहान मुले शाळेसाठी येत असतात. या दोन्ही गावांच्या मध्ये मुळा नदी वाहत असते पावसाळा सुरू झाल्यानंतर या मुळा नदीला पुर येत असतो या दोन्ही गावांना जोडनाऱ्या पुलावरून विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालुन प्रवास करत असतात. संगमनेर तालुक्यातील आमदार, खासदार,माजी मंत्री यांना ही धोकादाय परीस्थिती का दिसत नाही असा सवाल पालकांकडून विचारण्यात येत आहे.

एकुनच संगमनेर तालुक्यातील मुळा नदीला पुर आला असुन शेकडो शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. यामुळे शासनाने आम्हाला चांगला पुल बांधुन द्यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *