शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाचा पुण्यात जल्लोष

पुणे : बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून शुक्रवारी जल्लोष करण्यात आला. सारसबाग परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाला पुष्पहार अर्पण करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महालक्ष्मी मंदिरात आरती केली. पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

रक्ताच्या नात्याची शिवसेना नाही तर विचारांवर आधारित शिवसेनेचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या पदाधिका-यांकडून व्यक्त करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे असल्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला.त्यानंतर शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, युवा सेना प्रदेश सचिव किरण साळी, जिल्हासंपर्क प्रमुख अजय भोसले, रमेश कोंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आमचाच होता. आमदार, खासदार, कार्यकर्ते आजी- माजी पदाधिकारी आमच्याकडे होते. विधानसभेतही हे सिद्ध झाले होते, असे नाना भानगिरे आणि किरण साळी यांनी सांगितले. बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यास शिवसेना कटीबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply