शिवसेना दसरा मेळावा : शिवसेना दसरा मेळाव्यासाठी मुंबईत असा असेल कडेकोट बंदोबस्त

शिवसेना दसरा मेळावा : शिवसेनेतील दोन गटांमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमिवर मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ) हे वांद्रे येथील बीकेसी मैदानात दसरा मेळावा घेत असून उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क दादर या ठिकाणी होणार आहे.

याशिवाय दसऱ्याला देवीचं विसर्जन असल्यामुळे 20 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. एकाच वेळी होणाऱ्या दोन मेळाव्यांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

तर उद्याच्या दसरा मेळाव्याच्या बंदोबस्तासाठी 3200 अधिकारी, 15 हजार 200 पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे 1500 जवान, एक हजार गृहरक्षक दल, शीघ्रकृती दलाच्या 20 पथके, 15 बॉम्ब शोधक व नाशक पथके तैनात करण्यात येणार आहेत.

दसरा मेळावा पोलीस बंदोबस्त नियोजन पुढीलप्रमाणे -

ठाकरे गट शिवाजी पार्क मेळावा -

2 पोलीस उपायुक्त DCP, 3 सहाय्यक पोलीस आयुक्त ACP, 17 पोलीस निरीक्षक, 60 सहाय्यक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, 420 पोलीस कर्मचारी.

65 पोलीस हवालदार, 2 RCP प्लॅटून, 5 सुरक्षा बल पथक, 2 शीघ्र कृती दल QRT, 5 मोबाईल वाहनं.

4 पोलीस उपायुक्त DCP, 4 सहाय्यक पोलीस आयुक्त ACP, 66 पोलीस निरीक्षक, 217 सहाय्यक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, 1095 पोलीस कर्मचारी, 410 पोलीस हवालदार, यासह 8 RCP प्लॅटून, 5 सुरक्षा बल पथक, 5 शीघ्र कृती दल QRT, 14 मोबाईल वाहनं

यासह दोन्ही जागांवर -

बिनतारी संदेश यंत्रणा पथक

बॉम्ब स्कॉड (शोध पथक)

दुर्बीण वरून निरीक्षण पथक

गॅसस्कॉड

वज्र, वरुण जामर

CCTV व्हॅन

डॉगस्कॉड

याप्रमाणे मुंबई पोलिसांनी सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply