शिवजयंतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा अपमान, भाजपच्या बुचकेंची अरेरावी? राष्ट्रवादीत संतापाची लाट, पाहा VIDEO

image

पुण्यातील शिवनेरी किल्ल्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमात भाजपच्या आशा बुचके यांनी अरेरावी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. छत्रपती शिवरायांच्या पालखीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालखी घेत असताना आशा बुचके यांनी सुनेत्रा पवार यांना धक्का दिल्याचे समोर आलं आहे. बुचके यांचा धक्का देतानाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. पाळणा म्हणणाऱ्या महिलांना ढकलूनही त्यांनी फडणवीसांसमोर फोटोसाठी पोझ दिल्याचं दिसत आहे. तसेच यावेळी आमदार शरद सोनवणे यांच्याकडून माईक हिसकावून सुनेत्रा पवारांना ताटकळत उभे ठेवलं. त्यांच्याआधी बुचके यांनी भाषण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बुचके यांच्या अरेरावीमुळे कार्यक्रमाच्या शिस्त आणि राजकीय शिष्टाचारावर प्रश्न निर्माण झाल्याचे समोर आलं आहे. यावरून राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *