शिमला :  हिमाचलचमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; पाच बेपत्ता, एकाचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला असून, कुल्लू जिल्ह्यातील मणिकरणमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटीमुळे चोजमधील एक होमस्टे, कॅम्पिंग साइट आणि फूट ब्रिज वाहून गेला असून, यामध्ये पाच जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे किन्नौर जिल्ह्यात भूस्खलनामुळे NH-5 बंद करण्यात आला आहे. 

बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मणिकर्ण ते कसोल दरम्यान ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण खोऱ्यातील पार्वती नदीची उपनदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. त्यामुळे पार्वती नदीच्या काठावर असलेले कॅम्पिंग साईट पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. यामध्ये चार जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते ठप्प झाले असून, विशेषत: मणिकरण खोऱ्यातील बहुतांश रस्ते बंद करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि ठिकठिकाणी दगड पडल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

NH-5 सकाळपासून बंद

हिमाचलमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, भुस्खलनामुळे (Land Slide) NH-5 सकाळपासून बंद करण्यात आला आहे. महामार्ग बंद झाल्याने किन्नौरशी संपर्क तुटला असून, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply