शारदानगर येथे अजित पवार यांची अपघातग्रस्त व्यक्तीला मदत

माळेगाव - शारदानगर (ता. बारामती) येथे अपघात ग्रस्त रक्तभंबाळ झालेली व्यक्ती रस्त्यावर पडलेली दिसताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबविला आणि त्यांनी संबंधित जखमीला पुढील वैद्यकिय उपचार तातड़ीने मिळण्यासाठी मदत केली. ऐवढ्यावरच न थांबता पवार यांनी शहरातील गिरिराज हाॅस्पिटलच्या प्रशासनाही मोबाईलद्वारे संपर्क करीत संबंधित रुग्णावर योग्य तो उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

दत्तात्रेय आवाळे (रा. किकवी, ता.भोर) हे अपघात ग्रस्त व्यक्तीचे नाव आहे. सदर जखमीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकिय सूत्रांनी दिली. या मदत कार्य़ात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, धनवान वदक, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, खासगी सचिव हनुमंत पाटील, अॅड. रविंद्र माने रस्त्यावर उतरले होते. एेरवी शिस्तीचे आणि करारी स्वभाव म्हणून ओळखले जाणाऱे अजित पवार हे मानानेही तितकेच हळवे असल्याचे शारदानगर येथील अपघाताच्या घटनेवरून स्पष्ट झाले. दरम्यान, जखमी आवाळे हे आपल्या मुलीला मोटारसायकद्वारे घेवून भोर तालुक्यातील किकविला निघाले होते. शारदानगर येथे जनावरांसाठी वाढे घेवून निघालेल्या टेंम्पोला त्यांची मोटारसायकल धडकली आणि आवाळे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply