‘शरद पवार नाही म्हटले असतील, पण त्यांच्या मनातील आम्ही समजून घेऊ’ ; संजय राऊत

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये घुसळून निघालेल्या राजकीय परिस्थितीवर सेनेचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलं. या वर्षात मुंबई मनपाच्या निवडणुका आहेत. त्यासाठी भाजपनेही कंबर कसलीय.  

मात्र, मुंबईत मराठी माणसाविरोधात कितीही षडयंत्र रचा, आम्ही छाताडावर पाय ठेऊन जिंकू, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. येणाऱ्या सगळ्या मनपा शिवसेना ताकतीने लढेल आणि जिंकेल. हे सगळे असंतुष्ट आत्मे एकत्र आले तरीही आम्हीच जिंकू असं त्यांनी म्हटलं. 

कोल्हापुरात निवडणुकीदरम्यान पैसे वाटप होत असल्याचा आरोप भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना, गोव्यातील पणजी आणि साखळी मतदारसंघातही ईडी चौकशी लावा, असं राऊत यांनी म्हटलं आहे.चंद्रकांत पाटील यांनी याबाबत पुढाकार घ्यावा असं ते म्हणाले. ज्या पद्धतीने उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला, तसेच साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत यांचा विजय झाला, त्याचीही चौकशी लावावी, असं राऊत म्हणाले.

शरद पवार हे मोठे नेते आहेत. आम्ही सर्वजण त्यांचा आदर करतो. मोदी सरकारला नामोहरम करण्यासाठी काही हालचाली सुरू आहेत. देशातील सर्व पक्षांनी सोबत यावं, ही आमची भूमिका आहे. आणि पवारांच्या सक्रिय सहभागाशिवाय ते शक्य नाही, असं राऊत यांनी म्हटलं. या एकजूटीशिवाय पाऊल पुढे जाणार नाही आम्हाला सर्वांना माहिती आहे.

शरद पवार यांनी यूपीएचं अध्यक्षपद भूषवण्यास काही रस नसल्याचं सांगितलं होतं. त्यावर बोलताना, पवार साहेबांच्या मनात काय, हे आम्ही समजून घेऊ, असं राऊत म्हणाले. पवार यांच्या प्रयत्नाशिवाय, पुढाकाराशिवाय मोदींना सक्षम आणि भक्कम पर्याय नाही, असंही त्यांनी म्हटलंय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply