वाशीम : ताम्हिणी घाटात कार २०० फूट खोल दरीत कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू, तर तीनजण गंभीर जखमी

वाशीममध्ये माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात  होऊन अपघातग्रस्त कार २०० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी घडली. मृत तिन्ही प्रवासी वाशीम जिल्ह्यातील आहेत. जखमींवर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

सविस्तर वृत्त असे की, वाशीम जिल्ह्यातील काही युवक कोकण पर्यटनासाठी गेले होते. परतीच्या वाटेवर असताना माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात झाला. २०० फूट खोल दरीत कार कोसळली. यामध्ये गाडीचा चुराडा झाला.

Follow us -

या अपघातात ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला हे सर्व मृतक वाशीम जिल्ह्यातील आहेत. रोशन गाडे, प्रवीण सरकटे व रोशन चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यावर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply