लोणावळ्यात धुवाधार पाऊस, २४ तासात तब्बल २२० मिमी पावसाची नोंद

लोणावळ्यात मुसळधार पाऊस झाला असून गेल्या २४ तासात तब्बल २२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत एकूण एक हजार ५२२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून ही गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत एक हजार १७६ मिमी येवढा पाऊस झाला होता. जून महिन्यात पावसाने दडी मारली. परंतु, जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावत लोणावळा, मावळ येथील नागरिकांना झोडपून काढलं आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. मावळ परिसरात अनेक ठिकाणी शेताला तलावाचे स्वरुप आले आहे तर काही ठिकाणी रस्त्याला नदीचे रूप आले आहे.

गेल्या सहा दिवसात ९५२ मिमी पाऊस कोसळला आहे. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज अचूक ठरला असून मुसळधार पावसाने भुशी धरण ओव्हर फ्लो झालं आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास मावळातील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट येथे पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. विकेंडला तर लाखो पर्यटक लोणावळा शहराला भेट देत आहेत. यामुळं होत असलेली गर्दी, वाहतुक कोंडी यावर नियंत्रण ठेवण्याची कसरत पोलिसांना करावी लागत आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply