लोणावळा घाटात केमिकल टँकर उलटला; मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ आज सकाळी केमिकलचा टॅंकर उलटल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान वाहतूक जुन्या राष्ट्रीय महामार्गावरुन वळविल्याने लोणावळा शहरातील वाहतूकीचा जाम झाला आहे. बोरघाट पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार आज सकाळी पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या केमिकलच्या चालकाचे खंडाळा बोगद्यापुढे नविन अमृतांजन पुलाजवळ नियंत्रण सुटल्याने टॅंकर दुभाजक ओलांडत पुणे बाजूकडे द्रुतगतीवर आडवा झाला. यावेळी टॅंकरने कंटनेरला धड दिली. अपघातात दोन जण जखमी झाले आहे. 

या अपघातामुळे टॅंकरमधील केमिकल मार्गावर सांडल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला. अपघाताची माहीती मिळताच खंडाळा, दस्तुरी महामार्ग वाहतुक पोलिस, आयआरबीचे कर्मचारी, देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. रस्त्यावर सांडलेल्या केमिकलचा हवेशी संपर्क आल्याने ते अधिक घट्ट झाल्याने रस्ता साफ करताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. यादरम्यान वाहतूक पुण्याकडे येणारी वाहतूक थांबविल्याने वाहनांच्या जवळपास आठ ते दहा किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. तर मुंबईकडे येणारी वाहतूकही विस्कळीत झाली. द्रुतगती वरील वाहतूक थांबविल्याने मुंबईकडे जाणारी वाहने लोणावळ्यातून वळविल्याने शहरातही वाहनांच्या लांब रांगा लागल्या. पोलिसांच्या वतीने क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून मार्गावर सांडलेले केमिकल स्वच्छ करत मार्ग सुरक्षित करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply