‘लैंगिक इच्छा मरते’ सांगत माजी मंत्र्यानं बंद केले बिर्याणीचे स्टॉल

‘बिर्याणी’ म्हटलं मांसाहारी लोकांच्या पाणी सुटतं. मात्र, बिर्याणी खाणाऱअयांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिर्याणी खाल्याने लैंगिक इच्छा कमी होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील बिर्याणींची दुकाने बंद करण्यात आली आहेत.

तृणमूल काँग्रसचे ( टीएमसी ) नेते आणि माजी मंत्री रविंद्रनाथ घोष यांच्या नेतृत्वाखाली कूचबिहार येथील बिर्याणी दुकाने बंद करण्यात येत आहेत. रविंद्रनाथ घोष म्हणाले, “बिर्याणीत वापरण्यात येणाऱ्या मसाल्यामुळे लैंगिक इच्छा मरत आहे. मागील काही दिवसांपासून नागरिक याप्रकरणी तक्रारी करत आहेत.”

“बिहार आणि उत्तरप्रदेशची लोक ही बिर्याणी विकत आहेत. त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. तसेच, रात्रभर बिर्याणी दुकांनात धिंगाणा सुरु असतो. जेवणाच्या गुणवत्तेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत,” असेही रविंद्रनाथ घोष यांनी म्हटलं. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply