लव्हिव : रशियाच्या हल्ल्याचे केंद्र बनलेल्या युक्रेनमधील मारिउपोल शहरातील शाळेवर आज रशियाच्या सैन्याने बाँबफेक केली. या शाळेत जवळपास चारशे नागरिकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यामुळे शाळेची इमारत पडली असून अनेक नागरिक ढिगाऱ्यांखाली दबले गेले असल्याचा दावा स्थानिक अधिकाऱ्यांनी केला आहे. हा युद्धगुन्हाच असल्याची टीका युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी केली आहे.
नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्याबरोबरच रशियाकडून आता विस्थापितांनी आश्रय घेतलेल्या शाळा, रुग्णालये आणि इतर इमारतींवरही हल्ले करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. मारिउपोल शहरात गेल्या आठवड्यात रशियाच्या सैन्याने असे अनेक हल्ले केले आहेत. आज त्यांनी येथील एका शाळेच्या इमारतीवर हल्ला केला. शहरावर हल्ला सुरु झाल्यानंतर अनेक जणांनी या शाळेत आश्रय घेतला होता. रशियाच्या रणगाड्यांनी आज शाळेवर तोफगोळ्यांचा मारा केला, त्यावेळी येथे सुमारे चारशे जण आश्रयाला होते. यापैकी अनेक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. या शहरावर रशियाने केलेल्या अत्याचारांची आठवण पुढील अनेक शतके काढली जाईल, असा संताप झेलेन्स्की यांनी व्यक्त केला.
अझोव्ह समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या मारिउपोल शहराला गेल्या तीन आठवड्यांपासून रशियाच्या सैनिकांनी वेढा घातला आहे. या शहराचा पाणी आणि वीज पुरवठा अनेक दिवसांपासून खंडित असून कडाक्याच्या थंडीच्या काळात नागरिकांचे ऊब आणि अन्न-पाण्याविना हाल होत आहेत. रशियाच्या हल्ल्यात या शहरातील किमान २३०० नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
मॉस्को : युक्रेनच्या सैन्यतळांना नष्ट करण्यासाठी नव्याने क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा आणि त्यामध्ये स्वनातीत क्षेपणास्त्राचा वापर केल्याचा दावा रशियाच्या सैन्याने आज केला. कालही (ता. १९) रशियाने स्वनातीत क्षेपणास्त्राचा वापर करत हल्ला केला होता. रशियाच्या किंझल स्वनातीत क्षेपणास्त्राने मायकोलेव्ह शहराजवळील एका इंधनाच्या साठ्याला आपला निशाणा बनविले. या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीपेक्षा १० पट अधिक असून दोन हजार किलोमीटर त्याचा पल्ला आहे.हे पण वाचा-
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


