राष्ट्रपती निवडणूक २०२२ : आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान! द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा; कोण मारणार बाजी?

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा आमनेसामने आहेत. भारताचे १५ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी ४,००० हून अधिक सदस्य आज मतदान करणार आहेत. झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना अनेक प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिल्याने, संख्या स्पष्टपणे एनडीएच्या उमेदवाराच्या बाजूने आहे.

शिवसेना, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल (BJD), नितीश कुमार यांचा जनता दल-युनायटेड, शिरोमणी अकाली दल, मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्ष (BSP), अण्णाद्रमुक, टीडीपी, यांचा समावेश आहे. YSRCP आणि चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी या पक्षांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस , तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, एआयएमआयएम, राष्ट्रीय जनता दल आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (AIUDF). आम आदमी पक्षाने देखील विरोधी उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त विरोधी उमेदवाराच्या आवाहनाचे नेतृत्व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले होते.

इलेक्टोरल कोलेजच्या माध्यमातून राष्ट्रपतीची निवड होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार यामध्ये मतदान करतात. राज्यातील तसेच दिल्ली आणि पॉंडिचेरीतील विधानसभेतील निवडून आलेले सदस्य यामध्ये मतदान करणार आहेत. नामनिर्देशित सदस्यांना या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार नसतो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply