रायगड : रायफली, काडतुसे...बॉक्स, कागदपत्रे...हरिहरेश्वरच्या समुद्रातील संशयित बोटीत काय काय सापडलं?

रायगड: हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी आढळून आलेल्या संशयीत बोटमध्ये शस्त्रसाठा सापडल्यामुळे राज्यभरात या बोटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. बोटमध्ये सापडलेल्या रायफल आणि काडसूतामुळे या बोटद्वारे राज्यात काही घातपात करण्याचा कोणाचा डाव होता का? असा संशय व्यक्त केला जात आहे. 

समुद्र किनाऱ्यावर आढळलेल्या या संशयीत बोटमध्ये 3 Ak 47 रायफली, 225 जिवंत काडतुसांसह आणि 10 संशयीत बॉक्स सापडली आहेत. आज सकाळी हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयीत बोट आढळल्यामुळे चिंतेचे वातावारण निर्माण झालं आहे. शिवाय या बोटमध्ये आढळलेल्या शस्त्रसाठ्यामुळे तर पोलिस (Police) यंत्रणासह सर्व तपास यंत्रणा अलर्ट झाल्या असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, या बोटीचे इंडोनेशिया कनेक्शन समोर आलं असून या प्रकरणी २ इंडोनेशियन संशयीतांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच बोटमध्ये आढळून आलेल्या तीन Ak 47 रायफल आणि 225 जिवंत काडतुसांसह काही कागदपत्र आढळून आली असून ती इंडोनेशिया व ऑस्ट्रेलियाशी संबंधीत असल्याची माहिती समोर येत आहे.

या संशयीत बोटीचे पडसाद विधीमंडळात देखील उमटले असून मुख्यमंत्र्यांनी या घटनेबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. तर सुरक्षिततेच्या कारणास्तव रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय या बोटीबाबतचा तपास पोलिस आणि इतर तपास यंत्रणा करत आहेत. शिवाय सुरक्षिततेच्या कारणास्तव सध्या जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply