रात्रीचे भरनियमन रद्द करा; नाही तर वीज बिल न भरण्याचा इशारा टाव्हरेवाडी ता.आंबेगाव येथील गावकऱ्यांनी दिला

मंचर: “महावितरण कंपनी तर्फे टाव्हरेवाडी ता.आंबेगाव फिडरद्वारे गुरुवार (ता.७) पासून रात्रीच्यावेळी तीन ते चार तास भारनियमन सुरु केले आहे. या परिसरात बिबट्याचा वावर व उपद्रव वाढला आहे. रात्रीचे भारनियमन ताबोडतोब बंद करावे अन्यथा घरगुती वीजबिल न भरण्याचे आंदोलन गावकऱ्यांना हाती घ्यावे लागेल.” असा इशारा आदर्शगाव गावडेवाडी, अवसरी खुर्द व तांबडेमळा येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.याबाबतचे निवेदन राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मेलद्वारे पाठविण्यात आले आहे. अशी माहिती आदर्शगाव गावडेवाडीच्या सरपंच स्वरूपा ऋषिकेश गावडे यांनी दिली.

“आंबेगाव तालुक्यात सर्वत्र रात्रीचा वीजपुरवठा सुरु असतो. पण टाव्हरेवाडी फिडरवर भारनियमन सुरु केले आहे. अनेक कामगार मोटारसायकलवरून रात्रीच्या वेळी ये-जा करतात. या पूर्वी बिबट्याने नागरिकावर हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. असाहाय्य उकाड्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हैराण झाले आहेत. वीजेची बिले वेळेवर भरून हि भारनियमन केले जात असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थतता असून संतापाची भावना आहे. यासंदर्भात त्वरित निर्णय घेवून महावितरण कंपनीने कार्यवाही करावी.” असे सरपंच गावडे, अवसरी खुर्दचे सरपंच जगदीश अभंग, तांबडेमळा ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली भोर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

“आंबेगाव तालुक्यात अवसरी खुर्द ग्रामपंचायत लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकाची आहे. येथे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. गावठाणामध्ये राज्यातील व परराज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे वास्तव्य आहे. रात्रीच्या भारनियमनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. भारनियमन रद्द न झाल्यास गावकरी रस्त्यावर उतरतील.”



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply