राज ठाकरेंच्या भर सभेत सुरु झाली अजान, ठाकरे गरजले म्हणाले तो भोंगा बंद करा अन्यथा यानंतर महाराष्ट्रात जे होईल त्याला मी जबाबदार नाही

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज यांची आज औरंगाबादमध्ये सभा होत आहे. पुण्यातून हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरेंनी दोन घोषणा केल्या त्यापैकी एक होती औरंगाबादची सभा ठाकरे (Raj Thackeray Aurangabad Speech). आज राज ठाकरेंनी राज्यातील अनेक विषयावर भाष्य केले. राज ठाकरेंचे भाषण सुरु असताना मशिदीमध्ये अचानक अजान सुरु झाली. यानंतर राज ठाकरे चिडले आणि त्यांनी पोलिसांना विनंती केली की त्वरीत तो भोंगा बंद करा अन्यथा यानंतर महाराष्ट्रात जे होईल त्याला मी जबाबदार नाही. चार तारखेला भोंगे खाली नाही उतरले तर मी ऐकणार नाही असेही राज ठाकरे म्हणाले.

आपल्या भाषणात राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करुन दिली. औरंगाबादचं मूळ नाव खडकी, आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच, एक देवगिरीचा किल्ला दुसरी पैठण. महाराष्ट्र समूजन घेणं गरजेचं आहे, तो समजून घेऊ. जो जो इतिहास विसरला त्याच्या पायखालचा भूगोल सरकला असे राज ठाकरे म्हणाले. आजच्या सभेतही राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. माझी दोन भाषणं झाली, काय फडफडायले लागले. शरद पवार म्हणाले राज ठाकरे दोन समाजात भांडण लावत आहेत. पवार साहेब, जाती जातीमध्ये जो भेद करतायेत त्यामुळे महाराष्ट्रात दुही माजत आहे अशी टीका राज ठाकरेंनी शरद पवारांवरती केली आहे. शरद पवार म्हणाले राज ठाकरेंनी त्यांच्या आजोबांची पुस्तकं वाचावित. मी सर्व पुस्तकं वाचली आहेत तुम्ही फक्त तुमच्या फायद्याचे वाचले आहे असे राज ठाकरे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply