राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेसाठी पोलिसांच्या अटी; काय आहेत त्या जाणून घ्या

औरंगाबाद : अखेर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी आज गुरुवारी (ता.२८) परवानगी दिली आहे. पक्षाचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण महाजन यासह इतर नेते औरंगाबाद सभेच्या तयारीसाठी दाखल झाले आहेत. ही राज सभा १ मे रोजी होणार आहे. तत्पूर्वी मराठवाड्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. काही दिवसांपासून पक्षाचे नेते सभेला मंजूरी मिळाल्याचे सांगत होते. मात्र औरंगाबाद पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी त्याला मंजूरी दिलेली नव्हती. मात्र आज अखेर त्यांनी सभेला परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या आहेत.

अटी

- १५ हजारांपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये.

- सभेला जाताना-येताना कोणतीही घोषणाबाजी करु नये

- सभेच्या ठिकाणी फेरी काढू नये

- स्वयंसेवकांची नेमणूक करावी. त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक सिटी पोलिस चौकाकडे द्यावे.

- सायंकाळी ४.३० ते ९.३० रात्री दरम्यानच सभा आयोजित करावी

- वंश, जात, भाषा यावरुन चिथावणी देऊ नये.

   

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेसाठी पोलिसांच्या अटी; काय आहेत त्या जाणून घ्या

Leave a Reply