राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल मुस्लिम बांधवांचे अभिनंदन: संदीप देशपांडे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसैनिकांना केले होते. त्यानंतर आज अनेक मशिदींमध्ये सकाळची अजान ही भोंग्याविना झाली. याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे मुस्लिम बांधवाचं अभिनंदन केलं आहे. आज मुस्लिम बंधवांनी सहकार्य केले, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी राज ठाकरेंना  पाठिंबा दिला असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. 

संदीप देशपांडे म्हणाले की, माहीम मशिदीकडे मनसैनिक गेले तिथे अजान वाजली नाही त्यामुळे हनुमान चालीसा  वाजली नाही. राज ठाकरेंनी केलेल्या सामाजिक आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळे मुस्लिम बांधवांच अभिनंदन असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. 

४ मे नंतर जर मशिदींवरील भोंग्यावर सरकारकडून कारवाई झाली नाही तर आपण मशिंदीसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचं मनेसकडून सांगण्यात आलं होत. आज मनसेने दिलेला तो अल्टिमेटमची मुदत संपली असल्याने नवी मुंबईमध्ये मात्र मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी नेरुळच्या मशिद परिसरात अजान सुरू असतानाच लाउडस्पीकरसचा वापर करत मनसेकडून हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं आहे. शिवाय मशिद परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून जय श्रीराम ची घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply