राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षांना पदावरुन हटवलं; मविआला शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक झटका

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षांना पदावरुन हटवले आहे. सोबतच इतर दोन सदस्यांचीही नेमणूक रद्द करण्यात आली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून तत्कालीन मविआ सरकारचा आणखी एक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलला आहे. त्यामुळे मविआला हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचे अध्यक्ष पद काढण्यात आले आहे. तसेच आर. डी. शिंदे आणि किशोर मेंढे यांनाही आयोगाच्या सदस्य पदावरुन हटवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांना राज्यमंत्री दर्जा होता. तसेच आयोगाचे सदस्य आर. डी. शिंदे (सेवा ) आणि के. आर. मेढे (सामाजिक व आर्थिक) यांनाही पदावरून हटवण्यात आलं आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply