राज्यातील ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

सध्या राज्यात उष्णतेची लाट सुरू असताना काही जिल्ह्यांना पुन्हा अवकाळीचा फटका बसणार आहे.हवामान वीभागाने   नव्याने जारी केलेल्या अधिसूचनेत ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता आहे. मुंबई हवामान विभागाने यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. 

यात प्रामुख्याने अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे.रत्नागिरी , सिंधुदुर्ग , कोल्हापूर ,सातारा, सोलापूर सांगली तर विदर्भातील अकोला बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील उर्वरीत जिल्ह्यात उन्हाचा कडाका पाहायला मिळणार आहे.

कोकण , पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भात वादळी पावसाच्या इशाऱ्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या काळात कोकणातील आंब्यांवर परिणाम होण्याची भीती आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस म्हणजेच ८ एप्रिलपर्यंत राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटसह पाऊस पडेल. तर याउलट काही ठिकाणी अति उष्णता पाहायला मिळेल.

पुण्यातही सापेक्ष आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. रविवारी मुंबईमध्ये सापेक्ष आर्द्रता दिवसभर ५५ टक्क्यांच्या आसपास होती. तर, सोमवारी त्यात वाढ होऊन ती ७५ टक्क्यांच्या आसपास पोहोचली. पुढील दोन दिवस संध्याकाळनंतर पुण्यात ढगाळलेले आभाळ असू शकेल. वाढलेले तापमान आणि ढगाळ आभाळ यामुळे उकाड्याचे प्रमाण अधिक वाढलेले जाणवण्याचीही शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply