राजस्थान : धक्कादायक! पुतण्याकडून विधवा काकूची हत्या, मृतदेहाचे १० तुकडे केले अन् जंगलात फेकून दिले

श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली असताना असाच एक धक्कादायक प्रकार राजस्थानच्या जयपूरमध्ये उघडकीस आला आहे. पुतण्याने आपल्याच विधवा काकूची हत्या करत मृतदेहाचे १० तुकडे करून जंगलात फेकून दिले आहे. अनूज शर्मा असं या आरोपींच नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनूजने नुकताच बी-टेक पूर्ण केलं असून त्याला हरे क्रिष्णा चळवळीत सहभागी होण्यासाठी ११ डिसेंबर रोजी दिल्लीला जायचे होते. मात्र, त्याच्या काकूने परवानगी न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने अनूजने रागाच्या भरात काकूची हत्या केली.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मार्बल्स कापायच्या मशीनने मृतदेहाचे १० तुकडे केले. तसेच हे तुकडे एका सुटकेसमध्ये भरून दिल्लीजवळ असेलेल्या जंगलात फेकून दिले. तसेच थेट पोलीस ठाणे गाठत काकू बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान, सरोज शर्मा यांच्या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अनूजला अटक केली असून पोलीस मृतदेहाचो शोध घेत आहेत. तसेच मृतदेहाचे काही तुकडेदेखील पोलिसांनी जप्त केल आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *