S-400 हवाई संरक्षण प्रणालीचे (Air Defense System) पहिले स्क्वॉड्रन वायव्य भारतात कार्यान्वित झाले आहे, परंतु युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे रशियाकडून दुसऱ्या स्क्वॉड्रनच्या वितरणास थोडा विलंब झाला आहे.
रशियाने हवाई संरक्षण प्रणालीच्या ‘प्रशिक्षण स्क्वाड्रन’साठी सिम्युलेटर आणि इतर प्रशिक्षण उपकरणे भारतात पाठवण्यास सुरुवात केली आहे. परंतु दुसरे ऑपरेशनल' स्क्वॉड्रन. ज्याची डिलिव्हरी जूनमध्ये सुरू होणार होती, त्याला आणखी किमान एक महिना उशीर होईल, असं संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
भारतीय हवाईदलाला डिसेंबरमध्ये हवाई आणि सागरी मार्गाने पहिल्या S-400 स्क्वॉड्रनची डिलिव्हरी मिळाली. भारताने 2018 मध्ये रशियाशी 5.43 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 40,000 कोटी रुपये) करार केला होता. त्यानुसार भारतीय हवाईदलाला (IAF) प्रत्येकी सहा महिन्यांच्या अंतराने पाच S-400 स्क्वॉड्रन्स मिळणार आहेत.
पहिले S-400 स्क्वॉड्रन पंजाबमध्ये पाकिस्तान सीमेलगत तैनात करण्यात आले आहे. राफेल लढाऊ विमानांसाठी अंबाला एअरबेससारख्या महत्त्वपूर्ण संरक्षण स्थळांना त्यामुळे रक्षण होईल
इतर स्क्वॉड्रन्स देखील चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून असणाऱ्या हवाई हल्ल्यांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी नष्ट करण्यासाठी तयार असतील. एस-400 सिस्टीम 380km च्या रेंजमध्ये शत्रूचे बॉम्बर, जेट, गुप्तचर विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन ट्रॅक करून ते नष्ट करू शकतात.
प्रत्येक S-400 स्क्वॉड्रनमध्ये प्रत्येकी 128 क्षेपणास्त्रांसह दोन क्षेपणास्त्र बॅटरी असतात, ज्यामध्ये 120, 200, 250 आणि 380km च्या इंटरसेप्शन रेंज मिसाईल असतात, तसेच रडार आणि ट्रान्सपोर्टर-इरेक्टर वाहने असतात.
वॉशिंग्टनमध्ये नुकत्याच झालेल्या टू-प्लस-टू संवादामध्ये, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन म्हणाले होते की, बायडन प्रशासनाने CAATSA (काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरीज थ्रू सॅन्क्शन्स) अंतर्गत भारताच्या S-400 सिस्टीमच्या खरेदीसाठी मंजूरी किंवा सूट देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
S-400 प्रणाली समाविष्ट केल्याबद्दल अमेरिकेने यापूर्वी चीन आणि तुर्कीवर निर्बंध लादले होते. चीन आणि पाकिस्तानसारख्या आक्रमक शेजारी राष्ट्रांचा मुकाबला करण्यासाठी S-400 प्रणाली ही राष्ट्रीय सुरक्षेची गरज असल्याचे भारताने अमेरिकेला सांगितले आहे. शिवाय, 2017 मध्ये CAATSA लागू होण्यापूर्वी त्यांच्यासाठी संपादन प्रक्रिया सुरू झाली होती.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


