मोबाईल हिसकावताना चोरट्यानं दिला धक्का; ६१ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई: मोबाईल चोरांनी मोबाईल हिसकावताना दिलेल्या धक्क्यात ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालाडच्या मार्वे रोड, लुडस काॅलनी येथे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुकेश विक्रमदास भाटिया या ६२ वर्षी वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

लुडस काॅलनी येथील एसव्हीसी बॅकेजवळून भाटीया हे जात असताना अचानाक आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरांनी त्यांना ढकलून दिले. या धक्काबुक्कीत भाटीया खाली कोसळले आणि बेशुद्ध पडले. भाटिया यांना तातडीने शताब्दी रुग्णालय उपचारासाठी नेले. उपचारा दरम्यान भाटीया यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिस घटनास्थळी पोहचले. तपासाची चक्र फिरली आणि अवघ्या काहीतासात पोलिसांनी शारीक युनिस अन्सारी या आरोपीला अटक केली आहे, तर आसिफ शेख आणि आमीर या दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी भाटिया यांच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिस अधिक तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *