मोदींना माझी विनंती, समान नागरी कायदा आणा, लोकसंख्येवर नियंत्रण आणा – राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज ठाण्यात उत्तरसभा (Uttar Sabha) पार पडत आहे. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली. आज, जाहीर सभा घेण्याचे प्रमुख कारण, गुढीपाड्व्याची सभा झाल्यानंतर अनेकांनी माझ्यावर टीका केली, अनेकांनी तारे तोडले. मात्र, त्याला उत्तर देण्यासाठी मला पत्रकार परिषद घेण्यासाठी घ्यायची आवश्यकता वाटली नाही. कारण, पत्रकार परिषदेत काही पक्षांचे बांधील पत्रकार भाषणातील मुद्दे भरकटवतात म्हणूनच सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी हि जाहीर सभा आयोजित केली आहे.

महाराष्ट्रात अनेक नेते भामट्या पत्रकारांमुळे एकटे पडले आहेत मात्र राज्यात काही गुणी पत्रकारही आहेत. नागरिकांच्या मतांशी प्रतारणा करून राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आली. त्याआधी राज्यात पहाटेचा शपथविधी झाला होता. यासर्व गोष्टी मी जाहीर सभेत बोललो होतो. मात्र, तरीही माझी स्क्रिप्ट भाजपकडून आली अशी टीका करण्यात आली.
२०१९ पूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्या होत्या. मोदींवर मी बोलत होतो ,काही उघड भूमिका घेत होतो. मला ईडीची नोटीस आली त्यानंतर मी ट्रॅक बदलला अशी माझ्यावर टीका करण्यात आली. मात्र, मी आजही माझा ट्रॅक बदलला नाही. कोहिनुरच्या एका कंपनीत मी भागीदार होतो. मात्र, वर्षभरात मी त्या कंपनीतून बाहेर पडलो. कारण त्यात फंद्यात मला पडायचे नाही. त्याच प्रकरणात मला ईडीकडून नोटीस आली होती. मी त्याच प्रकरणाशी संबंधीत ईडीच्या चौकशीला जाऊन आलो होतो. आता कोणी व्यवसायही करायचा नाही का?
मला नोटीस आली मी ईडीच्या चौकशीला जाऊन आलो. मात्र, पवारांना नोटीची चाहूल लागली, तर राज्यात किती गोंधळ घातला गेला. मी मोदींच्या विरोधात बोललो कारण मला त्यांच्या भूमिका पटल्या नव्हत्या. पण त्याच मोदींची काही चांगली धोरणं मला पटली तेव्हा मीच अभिनंदन केलं. 370 कलम हटवल्यावर अभिनंदनाचे पहिले ट्विट मी केले होते. मोदींसारखा माणूस पंतप्रधान व्हावा हे मीच बोललो होतो.

आता मोदींना माझे सांगणे आहे. देशात समान नागरी कायदा आणा आणि दुसरं या देशातल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा. कारण, जी लोकसंख्या वाढतेय त्याने एक दिवस देश फुटेल. आम्हाला एक लेकरू आणि तुम्हाला पाच. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होणे आवश्यक आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply