मोखाडा : जंगलात वणवा पेटला ; वन्य प्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव

मोखाडा :  सध्यस्धितीत पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यासह लगतच्या ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात जंगलाला वणवा लागल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. वणवा कसा लागतो, कोण पेटवतो या बाबींवर खल होतो. मात्र, वणव्यामुळे जंगलातील दुर्मिळ वनौषधी, वनस्पती नष्ट होत आहे. ऊष्म्याचे प्रमाण वाढत आहे. नैसर्गिक पानवठे नष्ट होऊ लागले आहेत. वण्यप्राण्यांना  भक्ष्य मिळणे कठीण होऊन त्यांचे वास्तव्य, अस्तित्व  आणि जीव धोक्यात आले आहेत. त्यामुळे जंगली श्वापदांनी मानवी वस्तीकडे, भक्ष्य शोधण्यासाठी मोर्चा वळवला आहे. त्याचा परिणाम म्हणून, पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण जंगलपट्टी भागात बिबट्या  तसेच वाघाने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. 

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापुर हे तालुके तानसा अभयारण्याच्या काही भागासह सभोवताली संपुर्ण जंगलपट्टीने वेढलेलेले आहेत. या अभयारण्यात आणि जंगलात दुर्मिळ वनौषधी, वनस्पती तसेच पट्टेरी वाघ, बिबट्यांसह हजारो वन्य प्राणी, पशु आणि दुर्मिळ पक्षी आहेत. या अभयारण्यात आणि जंगलात वणवा पेटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. तसेच मोखाडा तालुक्यालगत असलेल्या ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत ही जंगलाला वणवां  लागल्याच्या घटना वर्षानुवर्षापासुन घडत आहेत. त्यामुळे या अभयारण्यात आणि जंगलात असलेल्या वनसंपदेसह वन्य प्राणी, पशु आणि पक्ष्यांचे जीव धोक्यात आले आहेत. या वणव्यांमुळे डोंगर बोडके होत असुन त्यामुळे या भागात ऊष्म्यातही वाढ झाली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply