मुंबई : सत्ता आल्यावर ज्यांना सर्वकाही दिलं; ते लोक नाराज झाले : उद्धव ठाकरे

मुंबई : आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधन केलं. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे धन्यवाद मानले. ते म्हणाले, ' आपलं सरकार स्थापन झाल्याझाल्या आपण रायगडला निधी देऊन सरकारला सुरुवात केली. आम्ही बळीराजाला कर्जमुक्त केलं. या सगळ्या गोष्टी का सांगतोय. आपण विसरणार तर नाही. मात्र, मागील दिवसांपासून जे काही सर्व सुरु आहे यामुळे काही गोष्टी बाजूला पडल्या.

औरंगाबाद जिल्ह्याला आपण संभाजीनगर नावं दिलं आणि उस्मानाबादला धाराशिव हे नावं दिलं. पण म्हणतात चांगली गोष्ट सुरु असली की नजर लागते. शरद पवार आणि सोनिया गांधी यांना धन्यवाद द्यायचे आहेत. तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धन्यवाद. हा ठराव मांडल्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विरोध केला नाही. आत्तापर्यंत ज्यांनी करायला पाहिजे ते बाजूला राहिले आणि ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती त्यांनी या कामासाठी साथ दिली.

शिवसेनाप्रमुखांनी अनेकांनी चांगल्या मार्गावर आणलं आणि मोठी झाल्यावर ज्यांनी मोठं केलं त्यांनाच हे विसरले. ज्यांना जे देता येईल ते दिलं असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेवरती नाव न घेता टीका केली. ज्यांना दिलं ते नाराज आणि नाही दिलं ते सोबत आहेत. या नात्याच्या जोरावरच आपण सोबत आहोत असं ते म्हणाले. शिवाय जे काही असेल ते समोर येऊन बोला अशी साद देखील मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना यावेळी घातली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply