मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेची सूत्रे कोणाकडे, चिन्हाचा वाद यावरून कायदेशीर लढाई सुरू असतानाच दसरा मेळाव्यावरून नव्याने निर्माण झालेल्या वादात उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये घेण्यास परवानगी दिल्याने शिवसेनेने शिंदे यांच्या विरोधातील पहिली न्यायालयीन लढाई जिंकली आहे.
शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहे. आमचीच शिवसेना खरी, अशी भूमिका या गटाने घेतली आहे. तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण या चिन्हावरही दावा केला आहे. हे सारे मुद्दे सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. पुढील आठवडय़ात पाच सदस्यीय खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. दुसरीकडे, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद उच्च न्यायालयात होता. उच्च न्यायालयाने शिवसेनेची शिवाजी पार्कची मागणी मान्य केल्याने शिवसेनेने शिंदे गटावर पहिल्या कायदेशीर लढाईत मात केली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
न्यायालयाने दिलेल्या परवानगीमुळे शिवसेना आणि शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हे समीकरण कायम राहिले आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर लगेचच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परंपरा पडली. ‘विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवतीर्थावर चला,’ अशी शिवसेनेची तेव्हा घोषणा असायची. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुमारे तासभराच्या भाषणात शिवसैनिकांना आगामी वाटचालीची दिशा द्यायचे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील बाळासाहेबांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळातील साऱ्यांचेच लक्ष असायचे. कारण ठाकरे कोणाची टोपी उडवतील वा कोणाला टीकेचे लक्ष्य करतील याची उत्सुकता असायची. बाळासाहेबांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे शिवसैनिकांना पर्वणीच असायची.
सुमारे ५० वर्षांच्या शिवसेनेच्या कार्यकाळात चार-पाच वेळाच दसरा मेळाव्यात खंड पडला. पावसाने मैदानात चिखल झाल्याने २००६ मध्ये मेळावा रद्द करावा लागला होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातही २०१४ व २०१९ मध्ये दसरा मेळावा झाला नव्हता. दसरा मेळावा हा नेहमी सायंकाळी होतो. सुरक्षेच्या कारणावरून मागे एकदा दसरा मेळावा सकाळी घेण्यात आला होता. गेली दोन वर्षे करोनामुळे दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात झाला नव्हता, पण ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने शिवसैनिकांशी संवाद साधला होता.
बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीही दसरा मेळाव्यात तेवढाच जोष असतो आणि गर्दीही होत असते. यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खरी शिवसेना कोणाची, हा कायदेशीर वाद सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना शक्तिप्रदर्शनाची ही संधी आहे. शिवसेना संपलेली नाही हे ठाकरे यांना दाखवून द्यायचे आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खोडा घालून शिवसेनेला खिजविण्याची शिंदे गटाची योजना होती; पण शिवाजी पार्कवर ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. शिंदे गटाला बीकेसी मैदानात मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळाली आहे.
शक्तिप्रदर्शन..
शिवसेनेचा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा बीकेसी मैदानात एकाच वेळी मेळावा झाल्यास शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मेळाव्यात जास्त गर्दी जमविण्यावरून स्पर्धा होईल. शिंदे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.
शहर
- Kalyan: कल्याणमध्ये चमत्कार! शिंदेसेना आणि ठाकरे सेना एकत्र, कोणत्या मुद्दावर झालं एकमत?
- RCB wins IPL : पुण्यात RCB समर्थकांचा जल्लोष, एफसी रोडवर राडा, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
- Pune Crime : चोरीसाठी गाजियाबाद- पुणे विमानाने प्रवास; एटीएम कार्ड बदलून लुटमारी, आंतरराज्य टोळीतील दोघे ताब्यात
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
महाराष्ट्र
- Shirur Accident: आईसोबतचा तो प्रवास ठरला अखेरचा! भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं, महिलेचा जागीच मृत्यू; २ चिमुकले गंभीर
- Uddhav Thackeray : नाशिकमध्ये ठाकरेंची मोठी कारवाई, दिग्गजाची पक्षातून हकालपट्टी
- Maharashtra Rain : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत धो-धो, विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरूवात; राज्यात कुठे काय परिस्थिती?
- Seat-Sharing : मुंबई, ठाण्यात महायुतीचं बार्गेनिंग सुरू, कोण किती जागावर लढणार?
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण