मुंबई : राणा दाम्पत्याच्या जामिनावर आज फैसला? मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी

मुंबई : राणा दाम्पत्याकडून मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचा आग्रह धरला होता. यानंतर शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा वाद रंगला होता. राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या ते तुरुंगात आहेत. 

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याच्या जामिन याचिकेवर आज उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्यावतीनं राज्य सरकारला देण्यात आले होते. त्यानुसार, राज्य सरकारच्या वतीनं उत्तर दाखल करण्यात आलं. त्यानंतर आज ही सुनावणी होणार आहे.

आमदार रवी राणा यांच्या विरोधात 17 गुन्हे दाखल आहेत तर खासदार नवनीत राणांविरोधात 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांचा या जामीनाला विरोध आहे. राणा दाम्पत्या अनेक गुन्हे दाखल आहेत. खोटे जात प्रमाणपत्र दिल्याचे आरोप देखील नवनीत राणा यांच्यावर आहेत. दोघांनाही जामीन मिळाल्यास बाहेर पडल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतोअसा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान, गुरुवारी राणा दाम्पत्यानं घरचं जेवण मिळण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्याचा जेल मधील मुक्काम वाढणार की त्यांना दिलासा मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply