मुंबई : महाराष्ट्रात ‘मास्क’मुक्ती की सक्ती?; आरोग्य मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार की नाही याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. या संवादानंतर मास्कचा निर्णय होणार असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला या संवादानेतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना मास्कबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्या परिस्थिती चांगली आहे, कोरोनाचे रुग्ण वाढत नाहीत. मात्र, आपण टेस्टिंग वाढवणार आहोत. सहा ते बारा वयोगटातील मुलांचे लसीकरण करणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

देशात आता पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागला असून दिल्ली पाठोपाठ सरकारने देखील मास्कसक्ती केली आहे. तर महाराष्ट्र सरकारने गुढीपाडव्यापासून राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवले होते. त्यापासून राज्यात मास्क सक्ती नव्हती. मात्र आता कोरोना रुग्ण देशभरात सापडत असल्याने मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना लसीकरण हाच कोरोनावरती प्रभावशाली उपाय असून, लहान मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सुचना त्यांनी राज्यांना दिल्या आहेत. मुलांच्या लसीकरणासाठी शाळांमध्ये लसीकरण (Vaccination) करण्यावर भर देण्याच्या सूचनाही पंतप्रधान मोदींनी केल्या. मोदी यांनी कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केल्यामुळे प्रत्येक राज्याने कोरोना रुग्ण आटोक्यात ठेवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply