मुंबई : बीएमसीच्या एमबीबीएस डॉक्टराचा विकृत चेहरा जगासमोर उघडकीस; महिला डॉक्टरला मॉर्फ फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

मुंबई : महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. सातत्याने बलात्कार आणि विनयभंगाचे प्रकार समोर येत आहेत. अशात आता मालाड बीएमसी पी-उत्तर विभागात नोकरी करणाऱ्या एका डॉक्टराने सहकारी महिलेचे फोटो मॉर्फ करून ते सोशल मीडियावर व्हयरल करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो पीडितेला अशा पद्धतीने धमकावत होता. या त्रासाला कंटाळून पीडितेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी २७ वर्षीय बीएमसी एमबीबीएस डॉक्टरला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरचे नाव सुशांत कदम असून पीडित महिला डॉक्टरच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आयपीसी कलम 354A(3), 500, 504, 506, 509 आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपी डॉक्टरला त्याच्या दिंडोशी संतोष नगर येथील क्लिनिकमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला एकदिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय जीवन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. सुशांत कदम हा महिला डॉक्टरसोबत मागील अनेक दिवसांपासून गैरवर्तन करायचा. दोघेही मालाड बीएमसी पी नॉर्थ विभागात एकत्र काम करत होते. कामावर असताना तो पीडितेला सतत त्रास देत होता. तसेच तिचे फोटो मॉर्फ करून ते सोशल मिडियावर व्हयरल करण्याची धमकी देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर एमबीबीएस डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या आवळल्यात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply