मुंबई: तुमच्या झुंडशाहीला शिवसेनेने झुंडशाहीनेच उत्तर दिलं; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई: खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे शुक्रवारपासून मुंबईत दाखल झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आलेल्या राणा दाम्पत्यावर आणि भाजपवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. सरकार असल्यामुळे आमचे हात नक्की बांधलेले आहेत. मात्र तुमच्या झुंडशाहीला शिवसेनेने झुंडशाहीनेच उत्तर दिलं असं राऊत म्हणाले आहेत.

राऊत म्हणाले की, कुणाच्यातरी पाठबळानं तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसणार तर आम्ही काय शांत बसू काय. आम्हाला शिकवू नका. तम्ही कोण आहात? तुमच्या लायकीत रहा. लक्ष्मण रेषा ओलांडाल तर शिवसैनिक तुमच्या घरापर्यंत घुसेल. राष्ट्रपती राजवट लावाण्याच्या धमक्या देत आहात तर लावा. ईडी, सीबीआय लावा, आम्हाला त्रास द्या आम्ही तुम्हाला घाबरत नाही असं राऊत म्हणाले. तसेच शिवसैनिकांवर आता कुणाचा कंट्रोल नाही. गेल्या दोन दिवसांत जे झालं ते फक्त शिवसैनिकांच्या नाही तर पूर्ण जनतेच्या भावनांचा उद्रेक आहे. मी सध्या नागपूरातून हे पाहतोय. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हालाही घरं आहेत हे लक्षात ठेवा. केंद्रीय पोलिस बळाचा वापर करुन आमच्या घरात घुसत असाल तर, आम्हाला आमच्या रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही, आमचे शिवसैनिक सक्षम आहे. आमचे शिवसैनिक सदैव मारायला आणि मरायला तयार असतात असंही राऊत म्हणाले.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *