मुंबई : जगातील सर्वात मोठया आकाराचे मालवाहू विमान मुंबई विमानतळावर

मुंबई: जगातील सर्वात मोठया आकाराचे मालवाहू विमान ‘एअरबस बेलुगा’ आणि आकर्षक रंगसंगती असलेले, आलिशान एम्ब्रेअर E195-E2 ही दोन्ही विमाने प्रत्यक्ष पाहाण्याचा अनुभव मंगळवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्टीय विमानतळावरील प्रवाशांना घेता आला. ‘एअरबस बेलुगा’ हे मालवाहू विमान विमानतळावर उतरले आणि प्रवासी अवाक झाले. या विमानाचा आकार ‘व्हेल माशा’ सारखा आहे. ‘एअर बस बलुगा’ या विमानाची मालवाहू क्षमता ५१ टन आहे. या विमानाची उंची १७ मिटर असून रविवारी कोलकत्ता विमानतळावर इंधन भरण्यासाठी हे विमान थांबले होते.

अंतराळात स्पेस शटल नेण्यासाठी १९९५ मध्ये एक महाकाय विमान तयार करण्यात आले होते. ते सुपर गप्पी नावाने ओळखले जात होते. त्याला पर्याय म्हणून एअर बस बलुगा हे महाकाय विमान तयार करण्यात आले. वैमानिक खाली आणि मुख्य भाग डोक्यावर अशी या विमानाची रचना आहे.याशिवाय जगातील सर्वात आकर्षक रंगसंगती असलेले आणि आलिशान म्हणून ओळखले जाणारे एम्ब्रेअर E195-E2 हे विमानही मुंबई विमानतळावर उतरले होते. ही दोन्ही विमाने अनेक प्रवाशांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply