मुंबई : गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या; राहतं घर ठरवलं अनधिकृत

मराठा आरक्षण, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या छत्रपतींविषयीचं आक्षेपार्ह वक्तव्य आणि शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावरील हल्ला या सगळ्याच प्रकरणांमुळे अॅड.गुणरत्न सदावर्ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यातच आता त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मुंबईतल्या हिंदमाता परिसरातलं सदावर्तेंचं राहतं घर अनधिकृत ठरवण्यात आलं आहे.

गुणरत्न सदावर्ते मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या १६ मजली इमारतीत राहतात. या इमारतीला अद्याप मुंबई महानगरपालिकेचं भोगवटा प्रमाणपत्र मिळालेलं नाही. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इमारतीतल्या सर्वच रहिवाशांना अनधिकृत रहिवासी म्हणून घोषित करण्यात आलं असून नियमाप्रमाणे या सर्वांनाच प्रस्ताव विभागाकडून 353 ए अन्वये दोनदा नोटीस पाठवण्यात आली आहे.

गुणरत्न सदावर्ते राहत असलेलं घर मूळ इमारत आराखड्यात फिटनेस सेंटर म्हणून दाखवण्यात आलं आहे. मात्र बिल्डरने त्यात बदल करून ते सदावर्तेंना विकलं. याबाबत सदावर्तेंना 347 (ए) नुसार अधिकृतपणे बदल केल्याचा ठपका ठेवत नोटीस बजावण्यात आली आहे. इमारतीमधील हे सर्वात मोठे अनधिकृत बांधकाम आहे. ते तोडत नाही तोपर्यंत इमारतीला भोगवटा मिळणार नाही, असेही इमारत प्रस्ताव विभागाने स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply