मुंबई – कार चालवणे झाले महाग, सीएनजीचे दर 4 रुपयांनी वाढले

मुंबई - पेट्रोल, डिझेल दरवाढीने आधीच सामान्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे आता पुन्हा एकदा सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईत सीएनजी कार चालवणे महाग झाले आहे. महानगर गॅस लिमिटेडने प्रति किलो मागे 4 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना सीएनजीसाठी प्रति किलोसाठी 76 रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ आज पहाटेपासून लागू करण्यात आली आहे.

नैसर्गिक वायू पुरवठ्याच्या किंमतीत 110 टक्क्यांनी भरघोस वाढ केल्यानंतर या किंमती वाढवण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. MGL ने 6 एप्रिल 2022 पासून तिसऱ्यांदा CNG च्या किमती वाढवल्या आहेत. एमजीएलने शुक्रवारी सांगितले की मुंबई आणि त्याच्या लगतच्या भागात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सीएनजीची किंमत 76 रुपये प्रति किलो असेल. तसेच देशांतर्गत पीएनजीच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

या ताज्या वाढीपूर्वी 1 ते 5 एप्रिल दरम्यान सीएनजीच्या किंमती प्रति किलो 6 रुपयांनी कमी झाल्या होत्या. त्यानंतर आता किलोमागे 16 रुपयांनी वाढ झाली आहे. राज्य सरकारने सीएनजीवरील व्हॅट 13.5 टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आणला होता, त्यानंतर त्याच्या किमती कमी करण्यात आल्या. मात्र आता महानगर गॅस लिमिटेडने प्रति किलो मागे 4 रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ आज पहाटेपासून लागू करण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply