मी गेल्यावर तुझं काय? या भीतीतून थरारक कृत्य; इस्रोच्या माजी कर्मचाऱ्याने पत्नीचा गळा दाबून घेतला जीव

image

आपण गेल्यानंतर आपल्या बायकोचे काय होईल या टेंशनमुळे नवऱ्याने बायकोचा खून केल्याची खळबळ माजवणारी घटना घडली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) एका निवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. ६५ वर्षीय नागेश्वर राव असे खुनीचे नाव आहे. नागेश्वर हा बेंगळुरूच्या बोम्मेहल्ली परिसरातील व्हर्चुओसो अपार्टमेंटमध्ये राहत होता. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मृत्यूची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *