मावळातील कुंडमळ्यात पर्यटन बंदी असूनही पर्यटकांची मोठी गर्दी

मावळ : पर्यटन तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाने मावळातील पर्यटनस्थळे ओसंडून वाहताना दिसते. यामुळे पर्यटन स्‍थळांवर जाण्यास काही दिवस बंद आहे. तरी देखील कुंडमळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाल्‍याचे पाहण्यास मिळाले.

मावळतील टायगर पॉईंट, भुशी डॅम, कुंडमळा हे पर्यटन स्थळे प्रसिद्ध आहे. मात्र मुसळधार पाऊस झाल्‍याने येथे पर्यटनास बंदी असूनही शेलारवाडीच्या इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळ्यात पर्यटकांची गर्दी झाली आहे. चार दिवसांपूर्वी याच कुंडमळ्यात मित्रांसोबत आलेली एक मुलगी वाहून गेली होती. तरीही सेल्फी काढणे, पाण्यात पाय सोडून बसणे असे प्रकार इथे घडत आहे. पण पर्यटकांनो आपला जीव अधिक मूल्यवान आहे. जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याच्या नादात आपला जीवही जाऊ शकतो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply