माझ्या मुुलाने मुख्यमंत्री व्हावं…योगेश कदमांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा; राजकीय वर्तुळात चर्चा!

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वाढदिवस मुंबईतील त्यांच्या पालखी बंगल्यात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. वाढदिवस साजरा करताना माजी मंत्री तथा शिंदे गटाचे नेते रादास कदम यांनी त्यांच्या पत्नीने योगेश कदम यांची स्तुती केली. मी भाग्यवान आहे की योगेश आणि सिद्धेश यांच्यासारखे मला चिरंजीव आहेत, अशा भावना रामदास कदम यांनी व्यक्त केल्या. तर माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा योगेश कदम यांच्या मातोश्री ज्योती कदम यांनी व्यक्त केली आहे. ज्योती कदम यांनी व्यक्त केलेल्या या इच्छेची राजकीय गटात चर्चा होत आहे. योगेश कदम यांनीदेखील आपल्या आई-वडीलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

रामदास कदम नेमकं काय म्हणाले?

“मी जेव्हा मंत्री झालो होतो, तेव्हा मला एकच खातं मिळालं होतं. आज माझा मुलगा योगेश कदम एकाच वेळी पाच-पाच खाती सांभाळत आहे. पाच खाती ते सांभाळत आहेत. भविष्यात एकनाथ शिंदे यांनी कुठलीही जबाबदारी दिली तर योगश कदम समर्थपणे सांभाळू शकतात,” असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले.

मला फोन करून सांगितले जाते की….

तसेच, योगेश कदम यांचे काम संपूर्ण राज्य बघत आहे. योगेश कदम हे जेव्हा विधीमंडळात असतात तेव्हा विधिमंडळातील माझे जुने सहकारी मला फोन करून सांगतात. योगेश कदम यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे, त्यांच्यात उत्तर देण्याची परिपक्वता आहे, असे मला फोन करून सांगितले जाते, अशी माहितीही रामदास कदाम यांनी दिली.

मला माझ्या मुलाबद्दल खूप अभिमान

योगेश कदम यांची आई ज्योती कदम यांनी प्रतिक्रिया दिली. मला माझ्या मुलाचा खूप अभिमान आहे. बापसे बेटा सवाई असा जो प्रकार असतो तोच इथे झाला आहे. मला माझ्या मुलाबद्दल खूप अभिमान आहे, अशा भवना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच माझा मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या.

मी नशीबवान आहे की मला…

आई-वडिलांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर योगेश कदम यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. मी आजा आई-वडिलांच्या, जनतेच्या आशीर्वादामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. राजकारणात पुढे पाऊल टाकत असताना जनतेच्या आधाराशिवाय पुढे जाता येत नाही. मी नशीबवान आहे की मला हजारो जनतेचा आशीर्वाद मिळत आहे, अशा शब्दांत योगेश कदम यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच जनतेचे आशीर्वाद घेऊन मी भविष्यात काम करणार आहे, असे आश्वासन योगेश कदम यांनी दिले आहे.

[embedded content]



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *