“माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील”, शिंदे-फडणवीस सरकारवर बोलताना शर्मिला ठाकरेंचं पुण्यात वक्तव्य

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर बोलताना जोरदार टोलेबाजी केली. “माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील,” असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून अद्याप काहीच चांगलं काम घडलेलं नाही, असं म्हणत शिंदे-फडणवीस सरकारला टोलाही लगावला. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “किमान रस्ते तरी नीट करा. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे झालीत, आता आपण ७५ वर्षे साजरी करत आहोत. महाराष्ट्र राज्य देशाला ४० ते ५० टक्के कर देतो. महाराष्ट्र केंद्राला करातून सर्वाधिक पैसे देतो, मग तुम्ही तुमचं राज्य तर नीट करा.”

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply