व्हॉट्सअप हा आता सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. अगदी ऑफिसपासून ते घरातील मंडळींचेही व्हॉट्सअप ग्रुप्स असल्याचं आपल्याला पहायला मिळतं. मात्र याच व्हॉट्सअपवरील डीपी सुद्धा कायम चर्चेत असतात. अनेकदा तर लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये आणि खास करुन नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा व्हॉट्सअप डीपीवरुनही वाद झाल्याच ऐकावयास मिळतं. पण हा घरातील वाद थेट पोलिसांपर्यंत पोहचला तर? पुण्यामध्ये काही असच झालंय. थेट पुण्याच्या पोलीस आयुक्तांपर्यंत एका तरुणाने पत्नी व्हॉट्सअपवरील डीपीवरुन भांडत असल्याची तक्रार ट्विटरवरुन केली, ज्याला पुणे पोलीस आयुक्तांनीही उत्तर दिलंय.
सध्या सोशल मीडिया म्हणजे अफवांचा बाजार असं चित्र निर्माण झालंय. मात्र त्यावेळेस याच माध्यमातून लोकांची जागृती करण्यासाठी आणि एका क्लिकवर त्यांच्यासाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या शहरांमधील प्रशासकीय यंत्रणा तसेच पोलीस अधिकारी आणि विभाग सोशल नेटवर्किंगचा प्रभावीपणे वापर करताना दिसत आहेत. यामध्येही महाराष्ट्रात मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांची ट्विटर अकाऊंट्स ही खास लोकप्रिय आहेत. या दोन्ही अकाऊंटवरुन मिम्स आणि तरुणाईच्या भाषेमध्ये ट्रेण्डींग विषयांना धरुन करण्यात येणाऱ्या पोस्ट चांगल्याच व्हायरल होत असतात. मुख्य अकाऊंट्सोबतच दोन्ही महत्वाच्या शहरांच्या पोलीस आयुक्तांचेही वेगळे अकाऊंट्स असून त्यावरही अशापद्धतीने जनजागृती केली जाते. याच जगजागृतीचा भाग म्हणून नुकताच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरवरुन लाइव्ह वीथ सीपी पुणे सीटी या अंतर्गत सर्वसामान्यांशी ट्विटरवरुन संवाद साधला. यादरम्यान अनेकांनी वेगवगेळे प्रश्न गुप्ता यांना विचारले. मात्र त्यात एका तरुणाने थेट पत्नीसोबतच्या व्हॉट्सअप डीपीवरुन होणाऱ्या वादावर तोडगा शोधण्यासाठी पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारला. त्यावर आयुक्तांनीही भन्नाट उत्तर दिलं.
झालं असं की, या संवादादरम्यान प्रतिक कारंजे नावाच्या व्यक्ती थेट पुणे पोलीस आयुक्तांना टॅग करुन प्रश्न विचारला. “मी माझ्या व्हॉट्अप डीपीवर पत्नीचा फोटो ठेवत नाही म्हणून ती नेहमी माझ्याशी भांडते,” असं या ट्विटमध्ये म्हटलं होतं. पुढे प्रतिक यांनी यासाठी पुणे पोलिसांनी गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सेल सुरु करतात तशा पद्धतीने घरगुती हिंसेसाठी सुरु केलेल्या भरोसा सेलकडे यासंदर्भात तक्रार करु शकतो का असा प्रश्न विचारला. “मी यासाठी पुणे पोलिसांच्या भरोसा सेलची मदत घेऊ शकतो का?”, असं प्रतिक यांनी विचारलं.
या अशाच काही मजेदार प्रश्नांची भन्नाट उत्तरं पोलीस आयुक्तांनी या लाइव्ह चॅटदरम्यान दिल्याचं पहायला मिळालं.
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
गुन्हा
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम



















Subscribe to my channel




