मुंबई : महापालिकेत घोटाळेच घोटाळे! मुंबईला देण्याऐवजी लुटण्याचं काम सुरु: फडणवीस

मुंबई: देवेंद्र फडणवीसांनी आज विधीमंडळामध्ये मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवला आहे. येत्या काही महिन्यांमध्येच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर आधीच राजकारण तापलेलं असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभावर टीका करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार असून पालिकेला सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजत आहेत. मुंबईला देण्याऐवजी लुटण्याचं काम सुरु केलंय. 

पुढे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, कोरोना काळात काढलेल्या सर्व कंत्राटात घोटाळे झाले आहेत. नालेसफाईत घोटाळा, रस्ते चर भरण्यात घोटाळा, टॅब खरेदीत घोटाळा, कोविड सेंटरमध्ये घोटाळा, सामग्री घोटाळा, पदाधिकारी काम दिले, आश्रय घोटाळा, पेंग्विन घोटाळा, उद्यान विकास घोटाळा, बेस्ट तिकीट निविदा घोटाळा अशी परिस्थिती मुंबई महापालिकेत आहे. मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरलं पाहिजे, अशी वृत्ती आहे. मात्र, यावर आम्ही बोललो तर आम्ही मुंबई मराठी माणसाचे शत्रू ठरतो. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply